Uncategorized

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या काटोल आगारातील बसमध्ये मद्यधुंद वाहकाचा अजब गजब प्रताप , कलम 85 अंतर्गत गुन्हा दाखल

प्रतिनिधी : अरविंद बनसोड,

कळमेश्वर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या काटोल आगारातील MH-20 BL-4202 क्रमांकाच्या बसमध्ये एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित वाहकाने मद्यप्राशन करून ड्युटी केल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात आला असून, या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर बसमधील वाहक प्रफुल हिवसे हे मद्यधुंद अवस्थेत प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांनी अनेक प्रवाशांना तिकीट न देता विनाकारण त्रास दिल्याची तक्रार आहे. प्रवाशांनी वारंवार तिकीटाची मागणी करूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.

सदर बसचे चालक सुनिल सराठे असून, संबंधित मार्गावरील तपासणी अधिकारी (T.I.) तांबेकर असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारामुळे केवळ आर्थिक गैरव्यवहारच होत नाही, तर प्रवाशांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. मद्यप्राशन करून ड्युटीवर हजर राहणे हा अत्यंत गंभीर शिस्तभंगाचा प्रकार मानला जातो.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत वाहक प्रफुल हिवसे यांची कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर त्यांच्या विरोधात कलम 85 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे.

या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ व सखोल चौकशी करून संबंधित वाहकावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

राज्य परिवहन महामंडळाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे अत्यावश्यक आहे. अन्यथा अशा घटनांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
जाहिराती, इंटरव्ह्यू, बातमी, Live प्रोग्राम करिता WhatsApp वर संपर्क करा : 📱9823360060 | महा विदर्भ टीव्ही ला लाईक, सबस्क्राईब जरूर करा | प्रतिनिधी नेमणे आहेत | इच्छुकांनी संपर्क करावे |
जाहिराती, इंटरव्ह्यू, बातमी, Live प्रोग्राम करिता WhatsApp वर संपर्क करा : 📱9823360060 | महा विदर्भ टीव्ही ला लाईक, सबस्क्राईब जरूर करा | प्रतिनिधी नेमणे आहेत | इच्छुकांनी संपर्क करावे |