15 दिवसात जल पर्यटनाचा प्रथम टप्पा पूर्ण करा.उपमुख्यमंत्री शिंदे यांचे विभागाला निर्देश
आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रयत्नाला यश भंडारा

प्रतिनिधी: मुकेश कुमार/9823360060
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील जागतिक दर्जा ठेवणाऱ्या गोसे धारणावर जल पर्यटन साकारण्याचे जे स्वप्न आम. नरेंद्र भोंडेकर यांनी बघितले होते ते आज पूर्णत्वास येतांना दिसत आहेत. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभांगांची बैठक घेऊन या जल पर्यटनाच्या प्रथम टप्प्यातील पाच स्थानांची कामे १५ दिवसाच्या आत पूर्ण करून या प्रकल्पाची सुरुवात करण्याचे निर्देश दिले. सोबतच या बैठकीत मेट्रो चे भंडारा पर्यंत विस्तारीकरणावर सुधा चर्चा करून या संदर्भात केंद्रीय रेल मंत्री यांच्याशी चर्चा घडविण्याचे सुधा अशावास्न दिले.
उल्लेखनीय आहे कि भंडारा शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला वेढ घालून जाणारी वैनगंगा नदीच्या अथांग पात्रात जागतिक पातळीचे जल पर्यटन घडवून आणण्याचे स्वप्न आम. नरेंद्र भोंडेकर यांनी बघितले होते. ज्या करिता प्रस्ताव पाठविताच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याला हिरवी झेंडी दाखवीत प्रथम टप्प्याला १०२ कोटींची मंजुरी प्रदान केली होती. या प्रथम टप्प्यात भंडारा, कोरंभी, मौदी, अड्याळ सह गोसे अश्या पाच स्थानांचा समावेश करण्यात आला होता. सोबतच दुसरा टप्पा म्हणून भंडारा २ व ३, कारधा, मांडवी, मकरधोकडा, पवनी, नेरला, करचखेडा, मौदि२ आणि जवाहर नगर चे समावेश करण्यात आले होते. ज्या नंतर या करिता लागणारी जल संपदा विभागाची ४५० एकर जागे करिता पर्यटन विभाग आणि जल संपदा विभागात सामंजस्य करार ही करण्यात आला. ज्या मुळे भंडारा जिल्ह्यातील जवळपास 10 हजार हून अधिक हातांना रोजगार मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
गेल्या काही दिवसात या प्रकल्पाचे काम कासव गतीने चालत होते, ज्या करिता पाठपुरावा म्हणून आम. नरेंद्र भोंडेकर यांनी उपमुख्यमंत्री यांना एक पत्रा द्वारे या प्रकल्प संदर्भात बैठक लावण्याची विनंती केली, ज्याला मान देत आज उपमुख्यमंत्री यांच्या सभा दालनात बैठक लावण्यात आली, यात जा पर्यटन संदर्भात आढावा घेत उप मुख्यमंत्री महोदयांनी जल पर्यटनाचे प्रथम टप्प्याचे काम येत्या १५ दिवसात पूर्ण करून प्रकल्पाला सुरुवात करण्याचे निर्देश दिले. सोबतच दुसऱ्या टप्प्यातील 10 गावांचा सर्वेक्षण करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश सुद्धा त्यांनी दिले. या वेळी मेट्रो चे विस्तारीकरण भंडारा पर्यंत करण्या संदर्भात हि चर्चा करण्यात आली. ज्यावर या संदर्भात केंद्रीय रेल मंत्री अश्विन वैष्णव यांना पत्र पाठवून यावर चर्चा बैठक लावण्याची मागणी करण्यात यावी असे निर्देश सुद्धा उपमुख्य्मान्त्रे शिंदे यांनी दिले. या वेळी नगर विकास १ चे अप्पर सचिव असीन गुप्ता, नगर विकास २ चे अप्पर सचिव एच. गोविंद राज, पर्यटन विभाग प्रधान सचिव खंदारे, एमटीडीसी चे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटने, पर्यटन विभाग वर सचिव श्रीमती अनिता तुमालवार, व्हीआईडीसी चे अधीक्षक अभियंता राजेश पाटील, कार्यकारी अभियंता राजेश ढोमणे, जल संपदा विभाग सचिव संजय बोलसरे, भंडारा चे जिल्हाधिकारी सावन कुमार, नगर परिषद मुख्याधिकारी जुम्मा प्यारेलाल, मेट्रो चे व्यवस्थापकीय संचालक राजेश जयस्वाल सह विविध अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.