खासदार श्री प्रफुल पटेल २४ व २५ एप्रिल ला दोन दिवसीय दौऱ्यावर

भंडारा : खासदार प्रफुल पटेल दोन दिवसीय दौऱ्यावर असून दिनांक २४ व २५ एप्रिल २०२६ ला विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दिनांक २४ एप्रिल शुक्रवारला सकाळी ११.३० वाजता कार्यकर्ता व पदाधिकारी भेट व चर्चा निवास स्थान, रामनगर, गोंदिया येथे उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ०६.०० वाजता हॉटेल गुलमोहर इन के पास सी एच रोड, बालाघाट येथे राम ज्वेलर्स शोरूमचे उदघाटनला उपस्थिती व दिनांक २५ एप्रिल शनिवारला दुपारी १२.०० वाजता पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक, तरोने हॉल, तहसील कार्यालय के पास, लाखांदूर जिल्हा भंडारा, दुपारी ०१.३० वाजता ऍड. मोहन राऊत यांच्या निवास स्थानी भेट, लाखांदुर. दुपारी ०२.३० वाजता पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक, स्थान – लक्ष्मीरमा सभागृह, पवनी जि. भंडारा येथे उपस्थिती तसेच वरील कार्यक्रमांना पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तरी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने वरील कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने केले आहे.