Uncategorizedआंतरराष्ट्रीयआरोग्यक्रीडागुन्हेजीवनशैलीटॉप न्यूजतंत्रज्ञानधर्म / ज्योतिषमनोरंजनराजकारणराष्ट्रीयव्यापारशिक्षण

IPL 2026 : Angkrish Raghuvanshi चा शतकी तडाखा, सराव सामन्यात झंझावाती खेळी

Angkrish Raghuvanshi Century: टीम इंडियाचा माजी अनुभवी फलंदाज आणि केकेआरच्या कोचिंग स्टाफचा भाग असेल्या अभिषेक नायर याच्या मुशीत अंगकृष रघुवंशी तयार झाला आहे.

आयपीएलच्या 19 व्या मोसमाचं काउंटडाऊन सुरु आहे. या 19 व्या पर्वाचा थरार 28 मार्चपासून सुरु होणार आहे. एकूण 10 संघांमध्ये पहिल्या टप्प्यात 20 सामने होणार आहेत. पहिल्या टप्प्यात प्रत्येक संघाला 4 सामने खेळायचे आहेत. स्पर्धेआधी खेळाडूंना सराव व्हावा याची पूर्ण काळजी टीम मॅनेजमेंट आणि कोचिंग स्टाफकडून घेतली जात आहे. खेळाडूंची तयारी व्हावी म्हणून केकेआर अर्थात कोलकाता नाईट रायडर्स टीमने आपआपसात सराव सामना खेळला. या सराव सामन्यात मुंबईचं देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या अंगकृष रघुवंशी याने क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अंगकृषने या सराव सामन्यात वादळी खेळी करत झंझावाती शतक ठोकलं आहे.

कोलकाता नाईट रायडर्स टीममधील खेळाडूंमध्ये शुक्रवारी 20 मार्च रोजी इडन गार्ड्न्समध्ये या सराव सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. केकेआरच्या सर्व खेळाडूंना या सामन्यासाठी 2 संघांमध्ये विभागण्यात आलं. गोल्ड नाईट्स विरुद्ध पर्पल नाईट्स या 2 संघांमध्ये खेळाडूंना विभागण्यात आलं.

गोल्ड नाईट्ससाठी रिंकु सिंह याने 40 तर टीम सायफर्ट याने 30 धावा केल्या. तर टीम सायफर्ट याने 30 धावांचं योगदान दिलं. सार्थक रंज याने 37 धावा ठोकल्या. या तिघांनी केलेल्या खेळीच्या जोरावर टीमने 199 धावा केल्या. तर पर्पल नाईट्ससाठी कार्तिक त्यागी याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
जाहिराती, इंटरव्ह्यू, बातमी, Live प्रोग्राम करिता WhatsApp वर संपर्क करा : 📱9823360060 | महा विदर्भ टीव्ही ला लाईक, सबस्क्राईब जरूर करा | प्रतिनिधी नेमणे आहेत | इच्छुकांनी संपर्क करावे |
जाहिराती, इंटरव्ह्यू, बातमी, Live प्रोग्राम करिता WhatsApp वर संपर्क करा : 📱9823360060 | महा विदर्भ टीव्ही ला लाईक, सबस्क्राईब जरूर करा | प्रतिनिधी नेमणे आहेत | इच्छुकांनी संपर्क करावे |